शासकीय कार्यालयांनी थकवला BMC चा ₹१८०० कोटींचा मालमत्ता कर

 शासकीय कार्यालयांनी थकवला BMC चा ₹१८०० कोटींचा मालमत्ता कर

मुंबई, दि. ११ : मुंबईतील विविध शासकीय कार्यालयांनी मुंबई महापालिकेचा तब्बल १८०० कोटी ३३ लाख रुपयांचा मालमत्ता कर थकविला असून त्यामुळे महापालिकेच्या महसुलावर मोठा परिणाम झाला आहे. कर भरण्याकडे सरकारी यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे.

जकात बंद झाल्यानंतर महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य आधार मालमत्ता कर राहिला आहे. मात्र अनेक शासकीय संस्था हा कर भरण्यास टाळाटाळ करत आहेत. करनिर्धारण विभागाकडून मिळालेल्या ताज्या आकडेवारीनुसार —

एमएमआरडीए : ₹९२९ कोटी ७९ लाख ७६ हजार ८५२

म्हाडा प्रशासन : ₹३६८ कोटी ५५ लाख ८९ हजार ९६७

मुंबई पोलीस विभाग : ₹७१ कोटी ४३ लाख ४२ हजार ६६२

राज्य सरकारी कार्यालये : ₹२२१ कोटी ८५ लाख ७८ हजार ०१७

केंद्र सरकारची कार्यालये : ₹२०८ कोटी ६८ लाख ७६ हजार ६०२

या सर्व शासकीय कार्यालयांनी मालमत्ता कर थकविल्यामुळे महापालिकेला हजारो कोटींचे नुकसान सहन करावे लागत आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *