भारत सरकारचा One island one Resort Plan

नवी दिल्ली, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मालदिवने चीनशी संगनमत करून मित्रत्वाचे नाते असलेल्या भारतावर कुरघोडी करायला सुरुवात केल्यामुळे आता भारतीय पर्यटकांचा या देशात जाण्याचा ओघ कमी झाला आहे. आता भारतीय पर्यटकांना आपल्या भारतीय बेटांवरच अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना भारत सरकारकडून आकारास येत आहे. One island one Resort Plan या मालदिवच्याच संकल्पनेवर ही योजना आधारित असली तरी तिला खास देशी रूप देण्यात येणार आहे. आपल्या देशाला विपूल सागर सान्निध्य लाभले असून १,३०० पेक्षा जास्त बेटे आहेत, त्यापैकी २८९ खडकाळ बेटे आहेत. इको टुरिझमच्या दृष्टीने विकासाला भरपूर वाव आहे. ‘वन आयलंड, वन रिसॉर्ट प्लॅन’च्या माध्यमातून अशा सर्व बेटांचा विकास करण्याची सरकारची योजना आहे. ‘न्यू इंडियन एक्स्प्रेस’ने या योजनेशी संबंधित मंत्रालयाच्या अधिका यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, सरकार खासगी संस्थांच्या सहकार्याने निर्जन बेटांचा विकास करण्याचा विचार करीत आहे. जेणेकरून ती सर्व बेटं पर्यटकांसाठी खुली होतील.

मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार बेटांवर रिसॉर्ट विकसित करण्याच्या मोठ्या योजनेवर काम करत आहे. ऑफशोर भागात भारतीय भौगोलिक क्षेत्रातील सर्व बेटे आणि भूभाग ओळखून तेथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील रिसॉर्ट्स आणि पर्यटन केंद्रे सुरू करण्याची सरकारची योजना आहे, जेणेकरून देशी-विदेशी पर्यटक तेथे भेट देतील आणि सुट्टयांचा आनंद घेऊ शकतील. या धोरणाच्या माध्यमातून सागरी क्षेत्रात इको टुरिझमला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. काश्मीर व्यतिरिक्त भारतातील ‘या’ राज्यातही तुम्ही जमीन खरेदी करू शकत नाही; नियम आहेत खूप कडक !

SL/ML/SL

3 Jan. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *