यंदाच्या आषाढी यात्रेत शासनाचे महाआरोग्य शिबीर

 यंदाच्या आषाढी यात्रेत शासनाचे महाआरोग्य शिबीर

सोलापूर, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यंदाच्या आषाढी यात्रेमध्ये पंढरपुरात राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीने महाआरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे. आरोग्याची वारी , पंढरीच्या दारी ह्या संकल्पनेवर आधारित २८ आणि २९ जून रोजी पंढरपुरात सुमारे २० लाख भाविकांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे.

ह्यासाठी राज्यातील वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर्स यांच्यासह परराज्यातून देखील वैद्यकीय पथके मागविण्यात येणार आहे. पंढरपुरात ३ ठिकाणी हे आरोग्य शिबिर होईल. यामध्ये आरोग्य यंत्रणेसह सकस आहार वारकरी भक्तांना दिला जाणार आहे. याबाबत आज आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर येथे बैठक घेण्यात आली. आषाढी यात्रेमध्ये राज्य शासनाचे विविध कार्यक्रम आजपर्यंत राबवले गेले. मात्र आरोग्य शिबिरसारखा लोकोपयोगी उपक्रम प्रथमच पंढरपूर येथे घेतला जात आहे.

ML/KA/SL

7 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *