गैरवापर होणाऱ्या सरकारी जमिनी परत घेणार

नागपूर, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात ज्या जमिनी भाडेपट्ट्यावर दिल्या गेल्या आहेत त्याचा जर कुणी गैरवापर करीत असेल किंवा ज्या उद्देशाने जमिनी दिल्या त्या उद्देशा व्यतिरिक्त त्या जमिनीचा वापर केल्या जात असेल तर अश्या जमिनींना परत घेण्यासाठी सरकार तर्फे विशेष मोहीम चालविली जाईल अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात लक्षवेधी सूचनेच्या उत्तराला दिली.
यासदर्भात लक्षवेधी सूचना सचिन अहिर, अमोल मिटकरी, प्रविण दरेकर, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मांडली होती.
तसेच राज्यात ट्रस्ट चा जागांची परस्पर विक्री करणाऱ्यांवर किंवा शासन जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण, लिज संपलेल्या जमिनीही शासन परत घेणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.Government lands which are misused will be taken back
ML/KA/PGB
15 Dec 2023