Zoho वर शिफ्ट झाले केंद्रीय कर्मचाऱ्यांचे 12 लाख ई-मेल
भारत सरकारने ७ लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सुमारे १२.६८ लाख ई-मेल खात्यांना NIC वरून काढून खासगी कंपनी ZOHO च्या प्लॅटफॉर्मवर स्थलांतरित केले आहे. इतकेच काय, पंतप्रधान कार्यालय आणि गृहमंत्री अमित शहा यांचे अधिकृत मेलही आता ZOHO वर आहेत. तथापि, जुन्या gov.in आणि nic.in डोमेनचा वापर सुरू राहील. त्याचबरोबर डेटाची मालकी सरकारकडेच राहील. या निर्णयामुळे ७.४५ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या ई-मेल खात्यांचे स्टोरेज, ॲक्सेस आणि प्रक्रिया सर्व काही ZOHO च्या नियंत्रणाखाली आले आहे.
ZOHO कंपनी आणि तिचे संस्थापक श्रीधर वेम्बू हे दोघेही भारतीय आहेत. वेम्बू हे एक अब्जाधीश उद्योगपती असून ZOHO कॉर्पोरेशनचे संस्थापक आणि माजी सीईओ आहेत. अमेरिकन मल्टीनॅशनल कंपनीतील लाखांची नोकरी सोडून ते कोणत्याही गाजावाजाशिवाय, दिखाव्याशिवाय गावात राहतात. गावातूनच आपली कोट्यवधींची कंपनी चालवतात.