सरकारी शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी अंतर वाली सराटीत

जालना, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अंतर वाली सराटी येथे गोदा पट्यातील १२३ गावाच्या मराठा समाज बांधवांची बैठक संपल्यानंतर आज सरकारचे शिष्टमंडळ गावात पोहचले असून या शिष्ट मंडळात मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, संदिपान भुमरे आदी जरांगे यांच्या भेटीला आले आहेत. या शिष्टमंडळाने मराठा आरक्षणाबाबत जरांगे सोबत चर्चा केली.
आरक्षणाबाबतचा शासनाचा एक अध्यादेश मंत्री गिरीश महाजन यांनी जरांगे यांना दिला त्यानंतर जरांगे यांच्यासोबत तिन्ही मंत्र्यांनी चर्चा केली, माध्यमांना या संवादापासून दूर ठेवण्यात आले होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह शासनाचे वरिष्ठ अधिकारी तिथे उपस्थितीत
होते .
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी २४ डिसेंबर ही तारीख दिलेली असून आरक्षणाची मागणी पूर्ण न झाल्यास मराठा बांधव मुंबई गाठतील असा इशारा देण्यात आला होता. मात्र अ सरकारकडून अद्यापी कुठलाच ठोस निर्णय न आल्याने २३ तारखेच्या बीड येथील सभेत पुढील दिशा ठरणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हे शिष्टमंडळ आज अंतर वलीत पोहचले असून त्यांनी जरांगेंशी चर्चा केली.
ML/KA/SL
21 Dec. 2023