नवीन विमान कंपन्यांना सरकारची मंजूरी
मुंबई, दि. २५ : केंद्र सरकारने इच्छुक एअरलाईन्ससोबत झालेल्या बैठकीनंतर भारतात नव्या एअरलाईन्सना ऑपरेशनची परवानगी दिली आहे. नागरिक उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी सांगितले की त्यांनी गेल्या आठवड्यात शंख एअर, अलहिंद एअर आणि फ्लाय एक्सप्रेसच्या टीमची भेट घेतली. यापैकी शंख एअरला आधीच एनओसी मिळाली होती, तर अलहिंद एअर आणि फ्लाय एक्सप्रेसला या आठवड्यात एनओसी प्राप्त झाली आहे. हा निर्णय डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात इंडिगोच्या ४,००० हून अधिक उड्डाणे रद्द झाल्यानंतर आणि क्षेत्रात निर्माण झालेल्या अराजकतेच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. शंख एअर, अलहिंद एअर आणि फ्लाय एक्सप्रेस या नव्या एअरलाईन्सच्या प्रवेशामुळे भारतीय विमान वाहतूक क्षेत्रात स्पर्धा, पर्याय आणि सेवा सुधारणा यांचा नवा अध्याय सुरू होणार आहे.
विमान कंपन्यांची माहिती
फ्लाय एक्सप्रेस
- मुख्यालय: हैदराबाद, बेगमपेट
- प्रमुख: कोंकटी सुरेश (मीडियातील माहितीप्रमाणे)
- मुख्य व्यवसाय: कुरिअर आणि कार्गो सेवा
- सेवा: डॉक्युमेंट्स, पार्सल, औषधे, खाद्यपदार्थ, घरगुती साहित्य, औद्योगिक उत्पादने
- आंतरराष्ट्रीय पोहोच: अमेरिका, ब्रिटन, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा, जर्मनी, दुबई, फ्रान्स इत्यादी देशांमध्ये लॉजिस्टिक्स सेवा
- स्थिती: सध्या पूर्ण ऑपरेशनल फेजमध्ये असून DGCA कडून एअर ऑपरेटर सर्टिफिकेट (AOC) मिळाल्यानंतर कमर्शियल उड्डाणे सुरू करतील.
- मुख्यालय: केरळ, कोच्ची (कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ऑपरेशन सुरू होणार)
- अलहिंद एअर
- मालक: Mohammed Haris T
- मुख्य व्यवसाय: टुर अँड ट्रॅव्हल्स (अलहिंद ग्रुप देशातील मोठ्या कंपन्यांपैकी एक)
- विमान ताफा: एटीआर 72 विमानांचा वापर करण्याची योजना
- सेवा: सुरुवातीला देशांतर्गत उड्डाणांवर लक्ष केंद्रित, नंतर संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरबसारख्या आंतरराष्ट्रीय मार्गांवर विस्तार
- स्थिती: एनओसी मिळाल्यानंतर DGCA कडून AOC मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
- शंख एअर
- शंख एअरला मंत्रालयाकडून आधीच एनओसी मिळाली आहे.
- या कंपनीबाबत सविस्तर माहिती अद्याप उपलब्ध नाही, मात्र लवकरच ऑपरेशनल तपशील जाहीर होण्याची शक्यता आहे.
- इंडिगोच्या मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द झाल्यानंतर प्रवाशांना पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने नव्या एअरलाईन्सना प्रोत्साहन दिले आहे.