गोरेगाव चित्रनगरीतील त्या निकृष्ट
कामाचे अखेर त्रयस्थ संस्थेमार्फत होणार लेखापरीक्षण

 गोरेगाव चित्रनगरीतील त्या निकृष्टकामाचे अखेर त्रयस्थ संस्थेमार्फत होणार लेखापरीक्षण

मुंबई, दि ३
मराठी भाषा दिनी मोठ्या दणक्यात खर्च करून सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी उदघाटन केलेल्या गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीतील स्टुडिओला अवकाळी पावसातच लागलेल्या गळती प्रकरणाचे त्रयस्थ संस्थेमार्फत लेखापरीक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत . व्यवस्थापनाच्या या आदेशनानंतर या प्रकरणी आंदोलन करण्याचा ईशारा देणाऱ्या डेमोक्रॅटीक आरपीआयने आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे
गोरेगाव येथील सुप्रसिद्ध दादासाहेब फाळके चित्रनगरीतील ८,९,१०,११ व १२ या स्टुडिओच्या देखभाल दुरुस्ती व नूतनीकरण कामे ठेकेदार कंपनीकडून करून घेण्याची जबाबदारी विजय बापट उप अभियंता (स्थापत्य) यांची होती. परंतु, त्यांनी दुरुस्तीचे कामे त्यांच्या मर्जीतील ठेकेदार कंपनीला दिली सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते फेब्रुवारी, २०२५ रोजी या स्टुडिओचे उद्घाटन करण्यात आले मात्र त्यांच्याकडून झालेली कामे निकृष्ट दर्जाची असल्यामुळेच स्टुडिओला अल्पावधीत गळती लागल्याची तक्रार करीत या कामाची चौकशी तसेच दोषींवर कारवाई करण्याची मागणी डेमोक्रेटिक आरपीआयचे मुंबई सरचिटणीस विशाल नावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती .


सादर प्रकरणाची चित्रनगरी प्रशासनाने दखल घेत या कामाची त्रयस्थ संस्थेमार्फ़त लेखापरीक्षण करून नियमानुसार कारवाई करण्याचे लेखी आश्वासन चित्रनगरीच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी गीता देशपांडे यांनी व्यवस्थापकीय संचालकांच्या मान्यतेने नावकर याना दिले आहे . दरम्यान हे लेखापरीक्षण होईपर्यंत आपले २ जुलै रोजीचा घोषित मोर्चा तात्पुरता स्थगित केला आहे . KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *