बोरिवली पश्चिम गोराई बस डेपोमध्ये २ विशाल अजगर आढळल्याने खळबळ
मुंबई, दि ५:- मुंबईतील बोरिवली पश्चिम गोराई बस डेपो परिसरात दोन विशाल अजगर आढळल्याने एकच खळबळ उडाली.काल सायंकाळचा सुमारास कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास हे अजगर आले, त्यानंतर तात्काळ वनविभाग आणि सर्पमित्रांना पाचारण करण्यात आले.दोन्ही अजगर सुरक्षितरित्या पकडून रेस्क्यू करण्यात आले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. अजगरांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.या घटनेमुळे काही काळ डेपो परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. AG/ML/MS