गोपीचंद पडळकर यांनी जतमधून उमेदवारी अर्ज दाखल केला
सांगली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातून भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. जत तहसीलदार कार्यालयात जाऊन पडळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज आणि संबंधित कागदपत्रे सादर केली. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत , डॉक्टर अरळी यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
आपण सांगली जिल्ह्यातील खानापूर आटपाडी तालुक्यातले रहिवासी असून दुष्काळी भागाची आपल्याला चांगली जाण आहे. यापूर्वी सुरेश खाडे आणि प्रकाश शेंडगे यांनी जत तालुक्याचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे आपण कुणी परकीय नसून सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाचे नागरिक आहोत . जत तालुक्याचे अनेक प्रश्न आज प्रलंबित असून पूर्व भागातील 64 गावांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे हा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आपला अग्रक्रम राहील असे पडळकर यांनी प्रसारमाध्यमाची बोलताना सांगितले. याअगोदर त्यांच्या समर्थकांनी जत शहरातून रॅली कडून जाहीर सभा घेतली. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भूमिका मांडल्या.
ML/ ML/ SL
28 Oct 2024