Google च्या नवीन सिक्युरिटी फिचरमुळे चोरांची होणार पंचाईत
मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Google ने अँड्रॉइड फोन्ससाठी नवीन सिक्युरिटी फिचर तयार केले आहे, ज्यामुळे चोराला तुमचा डिवाइस आणि डेटा अॅक्सेस मिळवणे जरा जास्तच कठीण होईल. लवकरच हे फीचर्स तुमच्या फोनवर उपलब्ध होतील. याआधी हे फिचर काही देशांमध्ये उपलब्ध होते परंतु लवकरच जगभरातील अँड्रॉइड फोन्सवर नवीन सिक्युरिटी फिचर सादर करण्याची तयारी गुगल करत आहे. या नवीन फिचरमुळे अँड्रॉइड युजर्सना चोरांपासून अधिक चांगली सुरक्षा मिळते. त्यामुळे जर कोणी तुमचा फोन चोरण्याचा प्रयत्न केला किंवा इंटरनेट कनेक्शन बंद केलं, तर गुगलचे हे नवीन टूल अतिरिक्त सुरक्षा थर तयार करतात. जर तुमचा फोन हरवला तर तुम्ही रिमोट लॉकच्या मदतीनं फक्त मोबाइल नंबर वापरून फोन लॉक करू शकता.
यातील सर्वात महत्वाचे फिचर म्हणजे Theft Detection Lock आहे, ज्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून तुमचा फोन लॉक केला जातो. तुमच्या हातून कोणी फोन ओढण्यासारखी संशयास्पद हालचाल फोनने डिटेक्ट केल्यास फोन लॉक होईल. त्यामुळे चोराला तुमचा अॅप्स किंवा डेटा अॅक्सेस करता येणार नाही.
दुसरे फिचर आहे ज्याचे नाव Offline Device Lock असे आहे हे तेव्हा अॅक्टिव्हेट होते जेव्हा तुमचा फोन इंटरनेट पासून बराच काळ डिस्कनेक्टड राहतो. यामुळे चोराला फोन ऑफलाइन ठेवता येत नाही आणि तुम्ही फोन ट्रॅक करू शकता.
तिसरं फिचर Remote Lock आहे, ज्यामुळे तुम्ही तुमचा फोन नंबर वापरून तुम्ही डिवाइस दुरून लॉक करू शकता. जर तुम्हाला गुगल फाईंड माय डिवाइस सर्व्हिस वापरता येत नसेल तर या दुसऱ्या मार्गाने तुम्ही डिवाइस दुरून लॉक करू शकता.