सुरक्षित आर्थिक व्यवहारांसांठी Google Pay’चे AI फीचर्स

 सुरक्षित आर्थिक व्यवहारांसांठी Google Pay’चे AI फीचर्स

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

Google Pay ने आपल्या युजर्ससाठी पेमेंट करताना वापरता येईल असे एआय फीचर्स सुरु केलं आहे. आता गुगल पेवर फक्त बोलून म्हणजेच व्हॉइस कमांडवर यूपीआय पेमेंट करता येणार असल्याची माहिती भारतातील गुगल पे चे प्रमुख उत्पादन व्यवस्थापक, शरथ बुलुसु यांनी दिली. या नव्या व्हॉइस फीचरद्वारे (Voice Assistance Feature) डिजिटल पेमेंट करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे. या फीचर्सबद्दलची संपूर्ण माहिती देण्यात आलेली नाही. छोट्या-मोठ्या व्यवहारांसाठी यूपीआयवर अवलंबून राहणाऱ्या सर्वांसाठी हे व्हॉइस कमांड अपडेटचे फीचर महत्त्वाचे ठरणार आहे.

व्यवहारांदरम्यान घाई गडबडीमध्ये कधीतरी रक्कमेच्या जागी चुकून पिन नंबर टाकला जातो किंवा चुकीची रक्कम टाकली जाते आणि घोळ होतो. अशा चुका लक्षात घेत त्या होऊ नये म्हणून ‘गूगल पे’ने एक खास नवं खास फिचर (Voice Assistance Feature) लॉन्च केलं आहे.

SL/ML/SL18 Feb. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *