Google Pay ने लाँच केलं पहिले क्रेडिट कार्ड

 Google Pay ने लाँच केलं पहिले क्रेडिट कार्ड

मुंबई, दि. १८ : Google ने भारतात आपले पहिले जागतिक क्रेडिट कार्ड लाँच केले असून ते अ‍ॅक्सिस बँकेच्या सहकार्याने RuPay नेटवर्कवर उपलब्ध झाले आहे. या कार्डची खासियत म्हणजे ते थेट UPI शी लिंक करता येते, ज्यामुळे ग्राहकांना दुकानं आणि व्यापाऱ्यांकडे सहज पेमेंट करता येते. गुगल पे क्रेडिट कार्डचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे प्रत्येक व्यवहारावर मिळणारे इन्स्टंट कॅशबॅक आणि रिवॉर्ड्स, जे लगेच पुढील खरेदीसाठी वापरता येतात. कंपनीने ग्राहकांना रिवॉर्ड्स रिडीम करण्यात त्रास होऊ नये यासाठी विशेष लक्ष दिले आहे.

भारतात UPI आणि क्रेडिट कार्डच्या एकत्रित वापराची मागणी झपाट्याने वाढत असून PhonePe, SBI Cards, HDFC, Paytm यांसारख्या कंपन्यांनी आधीच RuPay कार्ड्स बाजारात आणले आहेत. या स्पर्धेत गुगलचा प्रवेश भारतीय वित्तीय क्षेत्रात दीर्घकालीन उपस्थिती दाखवतो. विशेष म्हणजे Mastercard आणि Visa कार्ड्सना सध्या UPI शी जोडता येत नाही, त्यामुळे गुगल पे कार्डला वेगळेपणा मिळतो.

याशिवाय हे कार्ड ग्राहकांना त्यांच्या महिन्याच्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर करण्याची सुविधा देते, ज्यात सहा किंवा नऊ महिन्यांचे हप्ते भरता येतात. भारतातील फक्त 20% लोकांना क्रेडिटची सुविधा उपलब्ध असल्याने गुगल पेचे हे पाऊल देशातील विशाल बाजारपेठेत क्रेडिट कार्डचा प्रवेश वाढवू शकते.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *