EV चार्जिंग स्टेशन शोधणारे Google Map चे नवे फिचर

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या देशात इलेक्ट्रिक कार हा सर्वांत ट्रेंडींग विषय आहे. विविध कंपन्या आपल्या कार्सची अत्याधुनिक EV मॉडेल्स बाजारात आणत आहे. यामुळे मोठ्या शहरांमध्ये EV Charging Stations देखील उभारली जात आहेत. मात्र सध्या तरी ही स्टेशन्स शेधणे कार चालकांना कठीण जात आहे. इलेक्ट्रिक कारच्या मालकांना यापुढे चार्जिंग स्टेशन शोधण्यात अडचण येणार नाही. गुगल मॅप आता लोकांची ही समस्या दूर करणार आहे. गुगल मॅप्समध्ये आता एक नवीन वैशिष्ट्य जोडले जात आहे, ज्यामुळे इलेक्ट्रिक कार चार्ज करण्यासाठी स्टेशन शोधणे सोपे होईल. गुगल मॅप्समध्ये एक नवीन अपडेट केले जात आहे, ज्यामुळे ईव्ही चार्जिंग स्टेशनची माहिती देखील ऍप्लिकेशनवर दिली जाईल. येत्या काळात गुगल मॅपवर हे फिचर अपडेट केले जाईल.
या फीचरद्वारे गुगल मॅपच्या इतर वापरकर्त्यांना चार्जिंग स्टेशनचा मार्ग दाखवला जाईल. या ॲपवर दिशानिर्देश देण्याबरोबरच, ईव्ही चार्जिंग स्टेशन वापरणाऱ्या व्यक्तीकडून रिव्हू देखील घेतली जातील. या रिव्हू, चार्जिंग स्टेशनबद्दल अधिक माहिती वापरकर्त्याकडून गोळा केली जाईल. चार्जिंग स्टेशनवर लावलेले चार्जिंग प्लग आणि चार्जिंग रांगेत लागणारा वेळ याविषयी देखील वापरकर्त्याकडून पुनरावलोकन केले जाईल.
गुगल मॅप्स सुरुवातीला गूगल बिल्ट वाहनांसाठी ही सुविधा देणार आहे आणि या इलेक्ट्रिक वाहनांमधील बॅटरीची पातळी कमी होताच, कारमधील डिस्प्लेवर ईव्ही चार्जिंग स्टेशनची माहिती दिसेल. सर्व प्रथम, गुगल मॅप ही सुविधा अमेरिकेत (यूएस) देणार आहे. यानंतर भारतासह जगातील इतर देशांमध्ये ही सुविधा येऊ शकते.
SL/ML/SL