या TV Model मध्ये मिळणार नाही Google असिस्टंटचा सपोर्ट

 या TV Model मध्ये मिळणार नाही Google असिस्टंटचा सपोर्ट

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सॅमसंग युजर्सना आता एका महत्त्वाच्या फिचरला मुकावे लागणार आहे. कारण सॅमसंगनं गुगल असिस्टंट सोबत आपला करार संपवला आहे. त्यामुळे सॅमसंग टीव्हीमध्ये गुगल असिस्टंटचा सपोर्ट दिला जाणार नाही. रिपोर्टनुसार, १ मार्च २०२४ पासून सॅमसंग स्मार्ट टीव्हीमध्ये गुगल असिस्टंट चालणार नाही. हा निर्णय का घेण्यात आला असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल.

मात्र गुगल असिस्टंट फीचर सर्व स्मार्ट टीव्ही मॉडेलमध्ये बंद केलं जाणार नाही. हे फीचर २०२२ मॉडेल, २०२१ मॉडेल, २०२० ८के आणि ४के क्यूएलईडी टीव्ही, २०२० क्रिस्टल यूएचडी टीव्ही २०२० लाइफस्टाइल टीव्ही
काही निवडक स्मार्ट टीव्हीसाठी बंद केलं जाणार आहे.

२०२० मध्ये सॅमसंगनं आपल्या टीव्हीमध्ये गुगल असिस्टंटचा सपोर्ट देण्यास सुरुवात केली होती. परंतु ही भागेदारी फक्त ४ वर्षात बंद केली जात आहे. रिपोर्टनुसार, हा निर्णय गुगल पॉलिसी मध्ये बदल केला गेला असल्यामुळे घेण्यात आला असावा. परंतु गुगल असिस्टंट सपोर्ट बंद होण्याचे ठोस कारण मात्र कंपनीनं सांगितलं नाही. एक अंदाज असा देखील लावला जात आहे की सॅमसंग सध्या स्वतःच्या एआयवर जास्त लक्ष केंद्रित करत आहे, त्यामुळे देखील गुगलची साथ सोडण्याचा निर्णय घेतला गेला असावा.

SL/KA/SL

5 Feb. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *