ऑनलाईन फसवणुकीपासून वाचण्यासाठी Google चे खास AI फिचर

मुंबई, दि. १३ : वाढत्या ऑनलाइन फसवणुकीपासून युजर्सचे संरक्षण करण्यासाठी गूगल आपल्या विविध प्लॅटफॉर्मवर आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित नवीन सुरक्षा फीचर आणत आहे. आता गूगलने क्रोम ब्राउझरमध्ये (Google Chrome Browser) खास नवीन फीचर उपलब्ध केले आहे.गुगलने क्रोममध्ये ऑन-डिव्हाइस जेमिनी नॅनो मॉडेल (Gemini Nano Model) उपलब्ध केले आहे, जेणेकरून ऑनलाइन फसवणूक ओळखता येईल.
फसवणूक करणारे युजर्सना फसवून त्यांच्या संवेदनशील माहितीचा ॲक्सेस मिळवतात आणि या ऑनलाइन फसवणुकीविरुद्ध लढण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे गूगलने म्हटले आहे.गूगलने जाहीर केले आहे की क्रोम ब्राउझरचा “एन्हान्स्ड प्रोटेक्शन” मोड आता जेमिनी नॅनोद्वारे संचालित केला जाईल.
जेमिनी नॅनो हे हलकेफुलके आणि डिव्हाइसवर चालणारे मोठे भाषिक मॉडेल आहे. ही नवीन AI क्षमता फसवणूक करणाऱ्या वेबसाइट्स ओळखण्याद्वारे सुरक्षित ब्राउझिंगला अधिक सक्षम करेल. गुंतागुंतीच्या आणि विविध वेब पेजेसचे विश्लेषण करून, जेमिनी नॅनो क्रोम युजर्सना रिमोट टेक सपोर्ट स्कॅमपासून सुरक्षित ठेवण्यास मदत करेल.