मुंबई लोकलमधील महिला प्रवाशांसाठी गुड न्यूज

 मुंबई लोकलमधील महिला प्रवाशांसाठी गुड न्यूज

, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. रोज सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस लोकलला तुडुंब गर्दी असते. अनेकदा तर सकाळी ऑफिसच्या वेळेत ट्रेनमध्ये चढायलाही जागा उरत नाही आणि जरी जागा मिळाली तरी गर्दीत कसे तरी उभे राहायला मिळते. अशातच एखाद्या मिटिंगसाठी किंवा ऑफिसमध्ये जायचे असल्यास त्याच अवतारात जावे लागते. महिलांना अशावेळी खूप अडचणी निर्माण होतात. त्यामुळं रेल्वे प्रशासनाने महिला प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. 

महिलांच्या सुविधांसाठी मध्य रेल्वेने 7 स्थानकांवर महिला पावडर रुम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या रुममध्ये महिला मेकअप किंवा तयार होण्याव्यतिरिक्त मेकअपसंबंधी सामानही खरेदी करु शकणार आहेत. महिलांसाठी शौचालय, वॉशबेसिन, आरसा, ड्रेसिंग टेबलसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. फक्त 10 रुपयांत महिलांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. रेल्वेने महिलांसाठी संपूर्ण वर्षभराचा प्लानही तयार केला आहे. 365 रुपये भरुन संपूर्ण वर्षभर रुमचे सब्स्क्रिप्शन खरेदी करु शकतात. सध्या ही सुविधा लोकमान्य टिळक टर्मिनन्स, घाटकोपर, मुलुंड, ठाणे,मानखुर्द आणि चेंबूर स्थानकात उपलब्ध आहे. 

ML/KA/PGB
7 Oct 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *