मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या मद्यपान करण्याचा ट्रेंड सध्या वाढत आहे. या निमित्ताने झालेल्या मद्यविक्रीमुळे शासनाला देखील चांगला महसूल मिळतो. त्यामुळे यावर्षी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यप्रेमींसाठी ही मोठी घोषणा करणारे परिपत्रक जाहीर केले आहे.
२४ डिसेंबर, २५ डिसेंबर आणि ३१ डिसेंबर हे तीन दिवस दारुची दुकाने आणि बार पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. एरवी रात्री ११ वाजेपर्यंत दारुची दुकानं खुली ठेवण्यास सरकारची परवानगी आहे.
23 Dec. 2022