गोंदियात पुन्हा हुडहुडी, पारा ९.८ अंशांवर
गोंदिया दि ७ : मध्यंतरी थंडीचा जोर कमी होऊन पारा १५ अंशांवर पोहोचला होता. यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले होते. मात्र आता परत एकदा थंडीचा जोर वाढू लागला असून, पारा घसरून ९.८ अंशांवर पोहोचला आहे. गोंदियात थंडी ‘कमबॅक’ झाली असून, यंदा मात्र थंडीमुळे आरोग्याच्या तक्रारी जास्त प्रमाणात जाणवत असल्याचे दिसत आहे.
दिवाळी होऊनही थंडी जाणवत नसतानाच अचानकच थंडीने एंट्री मारली, अशी थंडी आली की जिल्हावासीय गारठू लागले. नोव्हेंबर महिन्यात ९ तारखेपासून थंडीने चांगलाच कहर केला होता. पारा ९.५ अंशांपर्यंत नोंदला गेला व गोंदिया सलग १०-१५ दिवस विदर्भात सर्वात थंड प्रदेश म्हणून नोंदण्यात आला होता.ML/ML/MS