सोन्याच्या भावात घसरणीला सुरुवात

गेल्या आठवड्यापासून लाखांचा पल्ला गाठणाऱ्या सोन्याच्या किमती आता कमी होई लागल्या आहे. आजही सोन्याच किंतीत घसरण नोंदवली गेली आहे. आज दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव ९३,०८० रुपये प्रति १० ग्रॅम आहे तर २२ कॅरेट सोन्याची किंमत ८५,२८७ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तसेच चांदीची किंमत ९५,४१० रुपये प्रति किलो आहे.
आज अमेरिकेच्या कॉमेक्सवर सोन्याची किंमत ३२६५.०० डॉलर्स प्रति औंस इतकी आहे तर चांदीची किंमत ३२.६३ डॉलर्स प्रति औंस इतकी आहे. यासोबत देशातील मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याची किंमत ९२,७६४.०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे तर चांदीची किंमत ९५,३५०.०० रुपये किलो इतकी आहे.