राज्यात या जिल्ह्यात सापडल्या सोन्याच्या खाणी

 राज्यात या जिल्ह्यात सापडल्या सोन्याच्या खाणी

मुंबई, दि.2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येत्या काळात राज्याच्या अर्थकारणाला सोन्याची झळाळी प्राप्त होऊ शकते. कारणही तसेच आहे, राज्यातील चंद्रपूर आणि सिंधूदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणी सापडल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये खाण क्षेत्रातील संधी या गुंतवणूकदारांच्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेत बोलताना मुख्यमंत्री एकनात शिंदे यांनी राज्यातील सोन्याच्या खाणींबाबत केलेला उल्लेख सगळ्यांचं लक्ष वेधणारा ठरला.

उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील मिंझरी आणि बामणी या भागात भूर्गभात सोन्याचे दोन ब्लॉक (खाणी) आढळून आल्या आहेत. तर कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागवाडी आणि घनपेवाडी भागात देखील सोन्याचा साठा आढळून आला आहे. 

SL/KA/SL

2 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *