ISSF विश्वचषकात 10 मीटर एअर रायफलमध्ये भारतीय जोडीने जिंकले सुवर्णपदक

 ISSF विश्वचषकात 10 मीटर एअर रायफलमध्ये भारतीय जोडीने जिंकले सुवर्णपदक

बर्लिन येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ (इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन) विश्वचषकात काल आर्य बोरसे आणि अर्जुन बाबुता या भारतीय जोडीने भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले.त्यांनी १० मीटर एअर रायफल मिश्र स्पर्धेत चीनच्या झिफेई वांग आणि लिहाओ शेंग यांना १७-७ असे हरवून सुवर्णपदक जिंकले. नॉर्वेच्या जीनेट हेग ड्युस्टॅड आणि जॉन-हर्मन हेग यांनी अमेरिकेच्या सेगेन मॅडलेना आणि पीटर मॅथ्यू फिओरी यांना १६-१४ असे हरवून कांस्यपदक जिंकले.

पात्रता फेरीत बोरसे आणि बाबुता यांनी ६३५.२ गुणांसह अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले बोरसे आणि बाबुता यांनी यापूर्वी ६३५.२ गुणांसह अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले. बाबुता यांनी पात्रता फेरीत ३१७.७ गुण मिळवले तर बोरसे यांनी ३१७.५ गुण मिळवले. दुसरी भारतीय जोडी, एलावेनिल वॅलारिवन आणि अंकुश जाधव यांनी ६३१.८ गुणांसह पात्रता फेरीत सहावे स्थान मिळवले. या वर्षाच्या सुरुवातीला, बोरसेने पेरूमधील लिमा येथे झालेल्या विश्वचषकात रुद्राक्ष पाटील सोबत १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकले.

बर्लिनमध्ये खेळल्या जाणाऱ्या विश्वचषकात भारत चार पदकांसह पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. भारतासाठी आर्य बोरसे आणि अर्जुन बाबुता या जोडीने १० मीटर रायफल मिश्र स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले, तर सुरुचीने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक जिंकले. तर शिफ्ट कौर समरा आणि एलावेनिल वलारिवन यांनी आपापल्या वैयक्तिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *