अमेरिका, इजरायल विरुद्ध इराण युद्धामुळे सोन्याला प्रचंड तेजी
मुंबई, दि २
अमेरिका इजरायल विरुद्ध इराण येथे सुरू असलेल्या युद्धामुळे सोने आणि चांदीचे भावात प्रचंड वाढ झाली आहे. या युद्धामुळे सोने एक लाख 75 हजार रुपये तोळा झाले असून चांदी तीन लाख पाच हजार रुपये किलो झाली आहे. लग्नसराईचे दिवस सुरू झाले असून मोठ्या प्रमाणामध्ये सोने, चांदीच्या दागिनामध्ये वाढ झाल्यामुळे नवरा आणि नवरीचे बजेट कोलमडले आहे. तर काही नवरदेवाने आपल्या होणाऱ्या नववधूसाठी आगामी बुकिंग करून कमी दराने सोन्याचे मंगळसूत्र सोनाराकडे बनवायला टाकले होते परंतु या युद्धामुळे भाव प्रचंड वाढल्याने त्यांची आता मोठी पंचाईत झाल्याचे बाजारात पाहायला मिळत आहे.
माझ्या मुलीचे लग्न अगदी तोंडावर आले आहे परंतु सोन्याचा भाव आज पावणे दोन लाख प्रति तोळा च्या वर गेल्याने सोने खरेदी करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात अडचण येत आहे. शेवटी लग्न म्हणजे सोने आलेच त्याशिवाय लग्न होणे म्हणजे अशक्यच आहे. त्यासाठी आम्ही इथून तिथून कर्ज काढून आज सोने खरेदी केले. पण या युद्धामुळे आम्हाला वाढीव दराने सोने खरेदी करावे लागले याची खंत असल्याची माहिती रितु सावंत या गृहिणीने दिली.
इराण युद्धामुळे सोन्याचा भाव पावणे दोन लाख रुपये झाला असून हा भाव आणखी वाढून दोन लाख होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या वाढलेल्या भावामुळे अनेक व्यापाऱ्यांनी चिंता व्यक्त केली असून सोन्याची आयात ही आता कमी झाली आहे. त्यामुळे झवेरी बाजारात सोने ही कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने आणि भाव वाढल्याने विक्रीही हवी तेवढी होत नसल्याची माहिती झवेरी बाजार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष कुमार जैन यांनी दिली.KK/ML/MS