धनत्रयोदशीनिमित्त झवेरी बाजारात सोन्याला चकाकी

मुंबई, दि १९
दिवाळी म्हटले की सोने खरेदीला उधाण येते. त्यातच धनत्रयोदशी म्हणजे सोने खरेदीचा शुभमुहूर्त असतो. पण तू सोन्याने सव्वा लाखाचा टप्पा पार केला असून देखील आज धनत्रयोदशीनिमित्त सोने खरेदी करण्यासाठी जवेरी बाजार येथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. सोन्याचा भाव दोन लाख रुपये पर्यंत जाणार अशी अफवा असल्याने आणि धनत्रयोदशीचा सुवर्णयोग असल्याने अनेक नागरिकांनी आज जवेरी बाजार येथे येऊन सोने खरेदी केली. यामध्ये महिलांचा कल हा महिलांची आभूषणे आणि दागिने खरेदी करण्याकडे होता तर पुरुषांचा कल हा सोन्याचे नाणे खरेदी करण्याकडे होता. तर अनेक महिलांनी धनत्रयोदशीला सोने खरेदी करतात असे परंपरा असल्याने काहींनी एक ग्रामचे का होईना परंतु सोन्याचे कानातले दागिने खरेदी केले. तर काहींनी आपल्या ऐपतीप्रमाणे सोने खरेदी केले.
माझ्या मुलीचे लग्न आहे परंतु सोन्याचा भाव आज सव्वा लाखाच्या वर गेल्याने आम्हाला सोने खरेदी करण्यासाठी फार मोठी अडचण येत आहे. शेवटी लग्न म्हणजे सोने आलेच त्याशिवाय लग्न होणे म्हणजे अशक्यच आहे. त्यासाठी आम्ही इथून तिथून कर्ज काढून आज सोने खरेदी केले अशी माहिती मनीषा चाकणकर या महिला गृहिणीने दिले.
सोन्याचा भाव हा दोन लाखाच्या वर जाणार असे मार्केटमध्ये चर्चा आहे. परंतु दरवर्षी धनत्रयोदशीला आमच्या दुकानात आणि जवरी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी होते. आतापर्यंत जवेरी बाजारामध्ये 40 करोडची उलाढाल झाली असून यापुढे पूर्ण दिवाळीमध्ये ही उलाढाल 200 करोड च्या आसपास जाणार असल्याची मार्केटमध्ये चर्चा पाहायला मिळत असल्याची माहिती जवेरी बाजार येथील कुमार जैन या व्यापाऱ्याने दिली.KK/ML/MS