अकलूज येथे झाला तुकाराम महाराजांचा गोल रिंगण सोहळा

अकलूज येथे झाला तुकाराम महाराजांचा गोल रिंगण सोहळा
सोलापूर, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे मोठ्या उत्साहात स्वागत झाले. अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात मानाच्या अश्वाचे तिसरे रिंगण पार पडले. इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे पहिले रिंगण पार पडले तर दुसरे रिंगण इंदापूर येथे पार पडले…
आज अकलूज येथे तिसरे रिंगण पार पडून पालखी सोहळा अकलूज मुक्कामी असणार आहे. हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील उपस्थित होते.
सोलापूर जिल्हा आगमनावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी स्वागत केले. Gol Ringan ceremony of Tukaram Maharaj was held at Akluj
ML/ML/PGB
12 July 2024