गोकुळधाम पतसंस्थेची शनिवारी वार्षिक सभा आणि विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ!

मुंबई, दि ३१ :गिरणी कामगारांनी गिरणी कामगारांसाठी उपनगरात कामगार वस्तीमध्ये प्रथमच स्थापन केलेल्या गोकुळधाम ओ-ऑप. क्रेडिट सोसायटीची,३७ वी.वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता, यशोधाम हायस्कूल, गोरेगाव पूर्व येथे संपन्न होत आहे.या प्रसंगी इयत्ता दहावी-बारावी परीक्षेतील उत्तीर्ण सभासदांच्या मुलांचा गुणगौरव सोहळा संपन्न होणार आहे. गुणगौरव समारंभाला विभागीय आमदार,(उबाठाचे) महाप्रतोद सुनील प्रभू,उपनेते आणि युवा शिवसेनेचे सचिव अमोल कीर्तिकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष काशिनाथ माटल भूषवतील.सेक्रेटरी श्रीपाद दिवेकर, उपाध्यक्ष आनंत शिंदे,खजिनदार शिवाजी खरात,सत्यवान राणे, गोविंद आजगावकर, लक्ष्मण भेलसेकर,लक्ष्मी बाबाजी परब, अदीती परब आदी संचालक त्यावेळी उपस्थित राहतील.याप्रसंगी सन २४-२५ चा वार्षिक नफा तोटा अहवाल संमत करण्यात येईल.सभासदांनी अगत्याने उपस्थित रहावे,असे संस्थेने आवाहन केले आहे.KK/ML/MS