गंगे प्रमाणेच आता गोदा आरती ही

 गंगे प्रमाणेच आता गोदा आरती ही

नाशिक,दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदी तीरावर दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो. आता हे स्थळ अजून एका कारणामुळे देशभर प्रसिद्ध होणार आहे. गंगानदीच्या तीरावर दररोज संध्याकाळी आरतीचे आयोजन केले जाते. त्याचप्रमाणे आता गोदातीरावर देखील आरतीचे आयोजन केले जाणार आहे.

नाशिकच्या रामकुंड परिसरात रोज महाआरती होणार असून अयोध्या, वाराणसी आणि हरिद्वारच्या धर्तीवर आता नाशिकचा कायापालट होणार आहे. या उपक्रमासाठी  केंद्र सरकारने 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

पंचायतम सिद्धपीठमचे महंत अनिकेत शास्त्री यांनी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे लावून धरलेल्या मागणीनुसार गोदावरी नदीवर महाआरती करण्यासाठी निधी मंजूर झाला आहे.

SL/KA/SL

16 Nov. 2022

 

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *