कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर

 कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर

नाशिक, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे ‘गोदावरी गौरव पुरस्कार’ आज जाहीर करण्यात आले आहेत.यंदाचा हा १७ वा पुरस्कार आहे. लोकसेवा, संगीत-नृत्य, चित्रपट-नाट्य, ज्ञान-विज्ञान, क्रीडा-साहस, चित्र-शिल्प आदी क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या मान्यवरांना सन्मानित करण्यात येते. आज प्रतिष्ठानचे पदाधिकारी ॲड. विलास लोणारी, लोकेश शेवडे, अजय निकम, कार्यवाह मकरंद हिंगणे, गुरूमित बग्गा यांच्या उपस्थितीत पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

पुरस्कारांचे प्रकार आणि विजेते मान्यवर

  • चित्रपट-नाट्य – आशुतोष गोवारीकर – प्रसिध्द दिग्दर्शक, अभिनेते
  • विवेक सावंत – महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन अर्थात एमकेसीएलचे संस्थापक
  • संगीत-नृत्य, डॉ. सुचेता भिडे-चापेकर – भरतनाट्यम क्षेत्रातील गुरु
  • चित्र-शिल्प प्रमोद कांबळे – शिल्पकार
  • लोकसेवा – डॉ. शमसुद्दीन तांबोळी – लोकसेवेसाठी मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष आणि मुस्लीम सत्यशोधक पत्रिकेचे संपादक
  • क्रीडा – सुनंदन लेले – क्रीडा पत्रकार

कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी १० मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. पुरस्काराचे वितरण प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

प्रतिष्ठानतर्फे १९९२ पासून दर दोन वर्षांनी गोदावरी गौरव पुरस्कार दिले जातात. २१ हजार रुपये रोख, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

SL/KA/SL

30 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *