परशुराम घाटातील नव्याने बांधलेल्या गॅबियन वॉलचा भाग कोसळला…

रत्नागिरी दि ४:– गतवर्षी मुसळधार पावसामुळे परशुराम घाटात वारंवार दरड कोसळण्याचे सत्र सुरू होते. परिणामी मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक परशुराम घाटामध्ये विस्कळीत झाली होती. काँक्रिटची संरक्षण भिंत फोल ठरल्यानंतर दरडीचा धोका टाळण्यासाठी याठिकाणी गॅबियन वॉल उभारण्यात आली. मात्र मान्सूनच्या सुरवातीलाच गॅबियन वॉल देखील कोसळू लागल्याने परशुराम घाटात दरड कोसळण्याचा धोका कायम असल्याचे बोलले जात आहे.