चंदनवाडी गोड गणपती मंडळाकडून मराठवाड्यातील पूरग्रस्तांना एक हात मदतीचा*

मुंबई : गेल्या आठवड्यात कोसळलेल्या भीषण पावसामुळे पूरजन्य परिस्थिती उद्भवलेल्या मराठवाड्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरामुळे अनेक संसार उपयोगी वस्तू वाहून गेल्या आहेत. तर काही वस्तू भिजून खराब झाल्या झाल्या आहेत. घरामध्ये सर्वत्र चिखल साचल्यामुळे स्वच्छतेसाठी लागणारे पाण्याची सुद्धा वानवा झाली आहे. पूर भागांमध्ये पिण्याचे पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. मदतीचा हात म्हणून महाराष्ट्रातल्या लालबागचा राजा शिर्डी, तुळजापूर, सिद्धिविनायक मंदिर अशा अनेक मोठमोठ्या देवस्थानांनी लाखो करोडो रुपयाची मदत पुरग्रस्त भागांसाठी जाहीर केली आहे. त्याच धर्तीवर आता मुंबईतील गणेश मंडळानी सुधा पुढाकार घेत हातभार लावण्यास सुर्वात केली आहे गिरगावातील गणेशोत्सवंपैकी गोड गणपती म्हणजेच अखिल चंदनवाडी सार्वजनिक गणेशउत्सव मंडळाने सुद्धा “मराठवाड्याला साथ देऊया पूरग्रस्त बांधवांसाठी हात पुढे करूया” या ब्रीदवाक्यखाली संपूर्ण परिसरात बॅनर लावून एक हात पुढे करून समस्त गणेश मंडळांना आवाहन करत मराठवाड्यातील पूरग्रस्त भागांना मदत करण्याचे आव्हान केले होते. त्यावर गिरगाव कुलाबा ताडदेव ग्रँड रोड इथल्या अनेक मंडळानी साथ देऊन आपल्या परीने जमेल तसे आणि जमेल त्या प्रकारे किराणा सामान , प्रथमोपचार साहित्य, सॅनिटरी पॅड्स चप्पल, स्लीपर्स, पाण्याच्या बाटल्या अयोडिंन टॅबलेट , पुरुष, महिला, लहान मुलांचे कपडे, बेडशीट ब्लॅकेट चटई रेनकोट टॉवेल्स, वह्या, पेन्सिल, पेन शालेय साहित्य, बिस्किट साबण टूथब्रश टूथपेस्ट असे महत्त्वाचे साहित्य मोठ्या प्रमाणात अखिल चंदनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांकडे आणून देण्यास सुरुवात केली आहे. हे सर्व साहित्य येत्या आठवड्यात मराठवाडा येथे जाऊन गोड गणपती चंदनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते स्वतः पूरग्रस्तांना वाटप करणार असल्याची माहिती मंडळाचे पदाधिकारी मिलिंद झोरे ह्यांनी दिले आहे.KK/ML/MS