धि गोवा हिंदु असोसिएशनचे रंगभूमीवर पुनरागमन

 धि गोवा हिंदु असोसिएशनचे रंगभूमीवर पुनरागमन

मुंबई दि १६ : मराठी नाट्यसृष्टी तसेच रसिक प्रेक्षकांसमोर सातत्याने दर्जेदार नाटके व संगीत नाटके सादर करणारी अग्रगण्य संस्था “धि गोवा हिंदु असोसिएशन” काही काळानंतर पुन्हा एकदा रंगभूमीची सेवा करण्यासाठी सज्ज झाली आहे. धि गोवा हिंदु असोसिएशन आणि सुकल्प चित्र यांच्या संयुक्त विद्यमाने “सुभेदार गेस्ट हाऊस” हे एक नवे कोरे मराठी नाटक लवकरच रंगभूमीवर सादर होणार आहे.

या नाटकाचे लेखन शिरीष देखणे यांनी केले असून दिग्दर्शनाची धुरा विजय केंकरे यांनी सांभाळली आहे. नाटकाचे नेपथ्य प्रदीप मुळ्ये, संगीत अजित परब, गीत वैभव जोशी, प्रकाश योजना शीतल तळपदे, रंगभूषा शरद विचारे आणि वेशभूषा मंगल केंकरे यांची आहे.

निर्मितीची बाजू धि गोवा हिंदु असोसिएशन, कल्पक सदानंद जोशी आणि अमरजा गोडबोले यांनी सांभाळली आहे. तर सूत्रधार म्हणून श्रीकांत तटकरे व राजेंद्र पै काम पाहत आहे.
धि गोवा हिंदु असोसिएशन पुन्हा एकदा रंगभूमीवर सक्रिय होत असल्याची बातमी समजताच नाट्यरसिकांमध्ये उत्सुकता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. आशयघन कथा, कसदार दिग्दर्शन आणि अनुभवी तांत्रिक टीम यांच्या जोरावर “सुभेदार गेस्ट हाऊस” हे नाटक प्रेक्षकांसाठी एक खास पर्वणी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.

लवकरच हे नवे कोरे नाटक रंगभूमीवर येणार असून, मराठी नाट्यप्रेमींना या नाटकाचा मनसोक्त आनंद लुटता येणार आहे.

या नाटकाचा मुंबईतील पहिला प्रयोग

दिनांक : शुक्रवार, २६ डिसेंबर २०२५
वेळ : दुपारी ३.३० वाजता
स्थळ : श्री शिवाजी मंदिर, दादर (पश्चिम), येथे सादर होणार आहे.

संपर्कासाठी :

श्रीकांत तटकरे : ९०८२४६८९६९
राजेंद्र पै : ९८२०३ २९००९

ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *