Go first पुन्हा एकदा सेवेत

 Go first पुन्हा एकदा सेवेत

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) वाडिया समूहाच्या मालकीची स्वस्त दरातील प्रवासी विमानसेवा ‘गो फर्स्ट’ला (पूर्वीची ‘गो एअर’) विमानसेवा काही अटी-शर्तींवर पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली. निधीच्या तीव्र चणचणीमुळे उड्डाणे ठप्प असलेल्या या हवाई सेवेच्या १५ विमाने आणि दैनंदिन ११४ फेऱ्या करण्याच्या योजनेला त्यांनी मान्यता दिली.

चालू वर्षात ३ मे रोजी ‘गो फर्स्ट’ने उड्डाणे तात्पुरती स्थगित करत असल्याचे जाहीर करतानाच, राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरणाच्या (एनसीएलटी) दिल्लीच्या खंडपीठापुढे स्वेच्छेने दिवाळखोरी निराकरण प्रक्रियेसाठी अर्ज दाखल केला होता. ‘गो फर्स्ट’ने रिझोल्यूशन प्रोफेशनलच्या (आरपी) माध्यमातून पुनरूज्जीवन योजना आखताना, २८ जून रोजी डीजीसीएकडे पुन्हा विमानसेवा सुरू करण्यासाठी अर्ज सादर केला होती. त्यानंतर, नियामकांनी मुंबई आणि दिल्लीतील ‘गो फर्स्ट’च्या सुविधांचे विशेष परीक्षण केले. त्यात समाधानकारक स्थिती आढळल्याने ही सशर्त परवानगी देण्यात आली.

या अटींवर उड्डाणास परवानगी
उड्डाणांसाठी सज्ज असलेल्या विमानांची योग्यता नेहमीच सुनिश्चित केली जाईल.

विमानांची स्थिती योग्य असल्याचे प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय विमान उड्डाणांसाठी वापरले जाणार नाही.

‘गो फर्स्ट’ने सादर केलेल्या योजनेतील कोणताही बदल ‘डीजीसीए’ला तत्काळ सूचित करावा लागेल.

आवश्यक अंतरिम निधीची उपलब्धता आणि ‘डीजीसीए’द्वारे उड्डाण वेळापत्रकाला मंजुरी मिळाल्यानंतरच तिकिटांची विक्री सुरू करता येईल.

SL/KA/SL

22 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *