निवडणूक आयोगाची महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जगजागृती
ठाणे दि १८ : महाराष्ट्रात येणाऱ्या निवडणुका पाहता मतदात्यांचा आकडा वाढावा तसेच 18 वर्षा वरिल नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा साठी आज निवडणूक आयोगाकडून महाविद्यालयीन विद्यार्थी संवाद , ठाण्यातील बेडेकर महाविद्यालय आयोजीत करण्यात आला होता.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांनी आज संवाद साधला.
मतदार यादीत नाव येण्यासाठी काय करावे लागेल, कोणता फॉर्म भरावा लागेल, अर्ज ऑनलाईन करायचा की ऑफलाईन, मतदार यादीत नावासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतील, अर्ज कुठे करावा, नाव नोंदणी अर्ज सादर करणे ते ओळखपत्र मिळणे या दरम्यान किती वेळ लागतो, मत दिलेल्या उमेदवारांने त्या मताचा गैरवापर केला तर काय करायचे .. तरुणाईला पडलेल्या अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे आणि जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडून ठाण्यातील विद्यार्थ्यांनी जाणून घेतल्या.
मतदार नोंदणी करणे का आवश्यक आहे, 17 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आगाऊ मतदार नोंदणी करता येते का अशा अनेक शंकांची उत्तरे यावेळी या अधिकाऱ्यांनी दिली. तर समृद्ध, सुजाण व बळकट आणि पारदर्शक लोकशाही प्रक्रियेसाठी तरुणांनी मतदार यादीत नाव नोंदणी करून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन यावेळी देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना केले.
ML/KA/SL
18 Nov. 2022