इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता , कोर्टात टिकणारे आरक्षण द्या

 इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता , कोर्टात टिकणारे आरक्षण द्या

नागपूर, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एकेकाळी लढवय्या असणाऱ्या मराठा समाजाची सध्याची आर्थिक, शैक्षणिक आणि जमिनी याबाबतची स्थिती बिकट झाली असून या समाजाला आता कायदेशीर दृष्ट्या टिकणारे आरक्षण देण्याची आवश्यकता आहे, महायुती सरकारच ते निश्चित देऊ शकेल अशी खात्री आपल्याला वाटते असं मत भाजपाच्या छत्रपती शिवेंद्र राजे भोसले यांनी विधानसभेत व्यक्त केलं. नियम २९३ अन्वये मराठा आरक्षणावर सत्तारूढ पक्षाच्या वतीने उपस्थित करण्यात आलेल्या चर्चेची सुरवात करताना ते बोलत होते.

इतरांच्या आरक्षणाला अजिबात धक्का न लावता मात्र कोर्टात कायम टिकणारे आरक्षण आम्हाला हवे आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ते देण्यात आलं होतं, उच्च न्यायालयात ही ते टिकलं मग पुढे ते का , कसं आणि कोणामुळे गेलं हे सगळ्यांना समजायला हवं अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

सध्या राज्यात जाती जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, मराठा आणि ओबीसी समाजाच्या दरम्यान गावपातळीवर संघर्ष सुरू झाला आहे, या जखमा बऱ्या होणाऱ्या नाहीत असं मत काँग्रसच्या अशोक चव्हाण यांनी या चर्चेत भाग घेताना मांडलं.

कायद्यात पन्नास टक्क्यांवर आरक्षण देण्याची तरतूद आहे, त्याचा लाभ इथे घेतला गेला पाहिजे , त्यासाठी संसदेत घटना दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणीही झाली आहे, यासाठी तत्कालीन महा आघाडी सरकारच्या वतीने आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून केली होती असं ते म्हणाले. राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षा नी राजीनामा दिला ही बाब गंभीर आहे, त्यांच्यावर कोणाचा दबाव होता ते सरकारने स्पष्ट करावे अशी मागणी चव्हाण यांनी यावेळी केली. Give reservations that hold up in court, without jeopardizing the reservations of others

ML/KA/PGB
12 Dec 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *