प्रिन्स आली खान रुग्णालयातील कामगारांना न्याय द्या
मुंबई प्रतिनिधी, दि. 22 : प्रिन्स अली खान रुग्णालयात काम करणा-या कामगारांवर व्यवस्थापक मार्फत झालेल्या अन्यायाविरुध्द शासनाने कामगारांना न्याय द्यावा असं जाहीर इशारा शिवसेना नेत्या आशाताई मामेडी यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित केलेला पत्रकार परिषदेत दिला. त्या पुढे म्हणाल्या आम्ही दिनांक २४/११/२०२५ रोजी सकाळी १० वाजता प्रिन्स अली खान रुग्णालय समोरून माझगांव महाराणा प्रताप चौक ते परत सेंट मेरी रोड वरून जे.जे. ब्रीज वरून आझाद मैदान अशी भव्य रॅली काढून “आमरण उपोषण” करत आहोत.
रुग्णालय प्रशासनाने त्या जागी नवीन रुग्णालय बनवावे.
नवीन रुग्णालय झाल्यावर कामगारांना परत कामावर रुजु करुन घ्यावे. तसेच जोपर्यंत नवीन रुग्णालय बनत नाही तोपर्यंत कामगारांना मासिक वेतन चालू ठेवण्यात यावे व बोनस, लिव्ह पगार देण्यात यावे. तसेच मेडिकल फॅसिलीटी देण्यात यावी.
त्याचप्रमाणे कामगाराच्या सेवानिवृत्तीनंतर त्याचे वारसास (मुलगा/मुलगी) कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी अशा प्रमुख मागण्या कामगारांच्या वतीने कराव्यात आल्या आहेत.
तसेच प्रिन्स अली खान रुग्णालय सन २०२२ साली धोकादायक इमारत ठरवून (स्ट्रक्चरल ऑडिट सी-१) आल्यामुळे रुग्णालय बंद करण्यात आले. २०१४ ला बी.एम.सी. ने मॅनेजमेंटला नोटीस दिली होती की, तुम्हांला हे हॉस्पीटल मोडायच्या अगोदर नवीन हॉस्पीटल बनवायचे आहे. त्यानंतर २०२२ ला हॉस्पीटल सी-वन कैटेगरी मैनेजमेंट दाखवून स्ट्रक्चर ऑडिट केल्यानंतर सी१ आलं असं दाखवून हायकोर्टात न तोडायची परमिशन घेतली. त्यावेळी हायकोर्टाने बी.एम.सी. ला सांगितलं होत याची शाहनिशा करून योग्य निर्णय घ्या. त्यामध्ये २ हप्ते (पंधरा) दिवसाची नोटीस लावून ते हॉस्पीटल तोडलं. परंतु हॉस्पीटल बंद करायची परमिशन हायकोर्टाने दिलेली नाही. हायकोर्टाच्या ऑर्डरमध्ये स्पष्ट लिहिलेला आहे की, ओ.पी.डी. आणि कन्सल्टी हे चालू ठेवायचा आहे परंतु रुग्णाला पैसे जाणून बुजून अशा प्रकारचा कामगारांवर अन्याय करत आहेत. यावेळी प्रिन्स अली खान रुग्णालयाचे कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.