कार्यक्रमांमध्ये पुस्तके द्या, पुष्पगुच्छ नको, या मुख्यमंत्र्यांचे आवाहन
डेहराडून: (दि. २२) उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी आज सांगितले की, इंटरनेट आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) च्या या युगात कार्यक्रमांमध्ये भेट म्हणून पुस्तके द्या, पुष्पगुच्छ नको. ज्येष्ठ पत्रकार जयसिंग रावत यांनी लिहिलेल्या “द न्यू पॉलिटिकल हिस्ट्री ऑफ उत्तराखंड” या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर धामी यांनी हे विधान केले. त्यांनी पुस्तके वाचण्याची सवय विकसित करण्याच्या महत्त्वावर भर देत म्हटले की, आजच्या इंटरनेट आणि एआयच्या युगात माहिती त्वरित उपलब्ध होते, परंतु पुस्तकांचे महत्त्व कधीही कमी करता येणार नाही.
SL/ML/SL