आमची प्रसूती २२ तारखेलाच करा , गर्भवतींनी केली मागणी

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उत्तर प्रदेशातील अयोध्येत 22 जानेवारीला रामलला एका भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत. त्याच दिवशी भगवान श्री रामच्या भव्य राम मंदिराची पायाभरणी होणार आहे. या कार्यक्रमाच्या अपेक्षेने संपूर्ण देश उत्साहाने भरला आहे. राम मंदिर ट्रस्टने या महत्त्वपूर्ण सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना आमंत्रित केले आहे. हा दिवस आनंदोत्सव म्हणून साजरा करण्यासाठी व्यापक तयारी केली जात आहे.
अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांना आवाहन केले की, 22 जानेवारीला अयोध्येत न येता हा दिवस एखाद्या सणासारखा साजरा करा. यातच उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक अनोखी बातमी समोर येतेय, ती म्हणजे कानपूरमधील गर्भवती महिलांनी डॉक्टरांकडे एक वेगळीच मागणी केली आहे. 22 जानेवारीला बाळाचा जन्म व्हायला हवा अशी इच्छा व्यक्त केली आहे. 22 जानेवारी हा शुभ दिवस असून या दिवशी बाळाचा जन्म व्हावा, अशी इच्छा गर्भवती महिलांची आहे.
2 जानेवारी रोजी बाळाचा जन्म झाला पाहिजे असा अट्टाहास करणाऱ्या केवळ उत्तर प्रदेशातील नाही तर देशभरातही हा ट्रेंड हळूहळू वाढत आहे. इतर राज्यांतील महिला आणि त्यांचे कुटुंबीय अशाच मागण्या करत आहेत. असे झाल्यास 22 जानेवारीला आरोग्य यंत्रणेवरचा भार वाढण्याची शक्यता आहे Give birth on January 22!
ML/KA/PGB
7 Jan 2024