लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्या
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : साहित्यसम्राट, महाराष्ट्रभूषण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपले उभे आयुष्य मानवतेसाठी व शोषण मुक्तीसाठी समर्पित केले. समाजातील वंचित, पीडित व शोषित समाज घटकांचा आवाज उठवण्याचे काम त्यांनी केले आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान अर्थात भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी लोकसभेत केली आहे.
लोकसभेत बोलताना खासदार प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या वास्तवदर्शी साहित्यातून माणूस व मानवीवृत्तीचे दर्शन घडवले आहे. शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचाराने प्रभावित अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखनीतून दिनदुबळ्यांची, उपेक्षित, कष्टकरी, पीडित, हालअपेष्टा सहन करत जगणाऱ्या घटकांच्या वेदनांची जाण समाजाला करुन दिलेली आहे. त्यांनी समता व बंधुत्वाचे विचार समाजात रुजवले. अण्णाभाऊ साठे यांचे लेखन सामाजिक परिवर्तनाचे माध्यम आहे. अण्णाभाऊ साठे यांनी ३५ काबंदऱ्या, १० लोकनाट्य, २४ लघुकथा, १० पोवाडे, एक नाट्य आणि एक प्रवास वर्णन असे विपुल लेखन केले आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या फकिरा या कादंबरीला महाराष्ट्र सरकारने १९६१ मध्ये उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार दिला आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही अण्णाभाऊ साठे यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या सामाजिक न्यायाचे कौतुक जेवढे करावे तितके कमी आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची दखल घेऊन देशाचा सर्वौच्च नागरी पुरस्कार भारत रत्न देऊन त्यांना सन्मानित करावे, असे प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या.
Give Bharat Ratna Award to Democrat Annabhau Sathe
SW/ML/PGB
30 July 2024