या नंबरवर मिस कॉल द्या आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा अर्ज मिळवा

 या नंबरवर मिस कॉल द्या आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा अर्ज मिळवा

मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कल्याणकारी राज्य या संकल्पनेला अनुसरून राज्य सरकारकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत आरोग्य सेवांसाठी आर्थिक मदत दिली जाते. विशेषत: आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना विविध शस्त्रक्रिया व आजारांवरील उपचारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक पाठबळ देण्यात येते. यासाठीचा अर्ज मिळवण्याची प्रक्रीया आता अगदी सोपी झाली आहे. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडून यासाठी ८६५०५६७५६७ हा मोबाइल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर मिसकॉल देताच तत्काळ मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज आपल्या मोबाइलवर उपलब्ध होणार आहे.

मिसकॉल केल्यानंतर अर्जाची लिंक एसएमएसद्वारे मोबाइलवर येईल. त्या लिंकवर क्लिक करताच अर्ज डाऊनलोड होईल. या अर्जाची प्रिंट आऊट काढून तो भरावा. आवश्यक कागदपत्रांसह पोस्ट, प्रत्यक्ष किंवा स्कॅन करून पीडीएफ स्वरूपात cmrf.maharashtra.gov.in या ईमेल आयडीवर पाठवता येईल, असे सांगण्यात आले आहे.

शिंदे -फडणवीस सरकारने मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून अद्याप ८ हजार रुग्णांना ६० कोटी ४८ लाख इतक्या मदतनिधीचे वाटप केले. दर महिन्याला दीड ते दोन हजार अर्ज वैद्यकीय मदतीसाठी दाखल होतात, पैकी १ हजार अर्ज मंजूर होतात.

अर्ज दाखल केल्यानंतर ७ दिवसांत वैद्यकीय मदत संबंधित रुग्ण दाखल असणाऱ्या रुग्णालयाच्या खात्यात रक्कम जमा केली जाते. मात्र हा अर्ज घेऊन मुख्यमंत्री सहायता निधीच्या मंत्रालयातील कक्षापर्यंत पोहोचणे ग्रामीण भागातील जनतेला शक्य होत नाही. अशा जनतेसाठी ही मिसकॉलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

SL/KA/SL

20 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *