मुंबईतल्या घरासाठी गिरणी कामगार एकवटला!
मुंबई, दि १०
हजारो गिरणी कामगार आणि वारसांनी आझाद मैदानावरील महाआंदोलनात मोठ्या संख्येने सामील होऊन संताप व्यक्त केला! आजचा मोर्चा अभूतपूर्व ठरला!
आझाद मैदानावरील कामगारांच्या आंदोलनात लढा समितीचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांनी सांगितले जो पर्यंत रखडलेल्या घरांचा हक्क मार्गी लागत नाही,तो पर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही.विधानसभा आणि मैदानामध्ये हा लढा नेटाने लढविला जाईल.ज्या गिरणी कामगारांनी स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी तर सर्वस्वाचा त्याग करून चळवळ यशस्वी केली.त्या गिरणी कामगारांना घराच्या हक्कापासून वंचित ठेवण्यात येत असेल तर हा लढा अधिक तीव्रतेने लढविला जाईल!
शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे म्हणाले,गिरणी कामगार घराच्या प्रश्नावर सरकार जोपर्यंत निर्णय घेणार नाही,तोपर्यंत उद्यापासून सभागृह चालूच देणार नाही.ज्येष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयवंत पाटील म्हणाले, गेली दोन वर्षे गिरणी कामगार लढत आहेत.परंतु आता हाऊस मध्ये या प्रश्नावर सरकारवर दबाव आणला जाईल.
काँग्रेस नेते भाई जगताप म्हणाले, सरकारची मानसिकता असेल तर हा प्रश्न सुटणे अशक्य नाही.आमदार मनोज जामसूतकर दकर गिरणी कामगार लढ्याला पाठिंबा देताना म्हणाले,प्रसंगी रस्त्यावर उतरून चक्का जाम केला जाईल.
आमदार जितेंद्र आव्हाड सरकारवर टीका करताना म्हणाले,मागील सरकारमध्ये गिरणी कामगारांच्या प्रश्नाबाबत सकारात्म कता होती.पण आज ती राहिलेली नाही.या सरकारला गरीब कामगारांची कणव राहिलेली नाही.
लढा समितीचे निमंत्रक गोविंदराव मोहिते म्हणाले,गिरणी कामगार संयुक्त लढ्या मधील सर्वच कामगार संघटनानी सभा घेऊन संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला.त्यामुळेच आजची सभा अभूतपूर्व ठरली आहे.
रखडलेल्या गिरणी कामगार घराच्या प्रश्नावर मुंबईसह महाराष्ट्रा तील, आमदार सचिन अहिर यांच्या खंबीर नेतृत्वाखाली १६ कामगार संघटनां च्या”गिरणी कामगार संयुक्त लढा समिती”च्या वतीने विधानभवनवर जो मोर्चा काढण्यात आला तो अखेर ऐतिहासिक आणि धडक मोर्चा ठरला.आजच्या आझाद मैदानवरील आंदोलनात कोकणपट्टी,तसेच पश्चिम महाराष्ट्राच्या ग्रामीण पातळीवरील कामगार आणि वारसदार मोठ्या संख्येने सामील झाले होते.
कोण म्हणतो देणार नाय घेतल्या शिवाय राहणार नाय, घर नाही कुणाच्या बापाचे, ते आमच्या हक्काचे! कामगारांमधून एकच घोषणा होत होती,आम्हाला मुंबई परिसरातील नव्हे तर मुंबईच घर मिळाले पाहिजे,अशा गगनभेदी घोषणामुळे आंदोलनात ताणतणाव निर्माण झाला होता.सेलु-वागणी येथील घर नको आता, मुंबईतच घर हवे, जोपर्यंत सकारात्मक निर्णय होणार नाही,तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही,असे आंदोलन कर्त्यानी आपला निर्धार त्यावेळी जाहीर केला. संध्याकाळचे सहा वाजले तरी मंत्रालयातून चर्चेचे आमंत्रण मिळेपर्यंत लढा चालूच ठेवण्यात आला होता.KK/ML/MS