आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींना उच्च शिक्षण मिळणार मोफत

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
नव्या काळाची आव्हाने स्वीकारण्यासाठी शैक्षणिक अभ्यासक्रमात मोठे बदल करण्यात येत आहेत. मुलींना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणात विशेष तरतूदी करण्यात येत आहेत.मुलींना व्यावसायिक शिक्षणात मोठ्या प्रमाणावर सहभागी करून घेण्यासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमही मोफत केले जाणार आहेत. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.8 लाखांपेक्षा कमी असलेल्या मुलींना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत (CAP) प्रवेश घेण्यासाठी 100% सवलत देण्यात येणार आहे. हा निर्णय मुलींच्या शिक्षण प्रवासाला नवी दिशा देणार आहे.
CET परीक्षांची तयारी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी ‘अटल’ प्रणालीद्वारे ऑनलाइन सराव परीक्षांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही स्पर्धा परीक्षांची संधी मिळणार आहे.
फेब्रुवारी 2025 मध्ये राज्यभरातील 6000+ महाविद्यालयांमध्ये संविधान गौरव महोत्सव आयोजित केला जाणार आहे. भारतीय संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा अभिमान आणि संविधानाच्या मूलभूत तत्वांची माहिती देणारा हा विशेष उपक्रम ठरणार आहे.
महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवून देण्यासाठी एक खिडकी प्रणाली (Single Window System) कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे देशविदेशातील विद्यार्थ्यांना सहज प्रवेश मिळेल व महाराष्ट्र उच्च शिक्षणाचा ब्रँड तयार होईल. अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन यासारख्या अभ्यासक्रमांची मराठी पुस्तके उपलब्ध होणार आहेत.
SL/ML/SL
16 March 2025