उधारी परत न केल्याने तरूणीची मित्राने केली कोयत्याने हत्या, पुण्यातला धक्कादायक प्रकार
पुण्यातील आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका मुलीच्या हत्येने खळबळ उडाली आहे. तिच्या सहकाऱ्याने पार्किंगमध्ये चॉपरने हल्ला करून तिला संपवलं. या प्रकारानंतर पोलिसांनी सहकाऱ्याला अटक केली आहे. या हत्येचं धक्कादायक कारणही समोर आलं आहे. पुण्यातील येरवडा येथील आयटी कंपनीत काम करत असलेल्या शुभदा कोदारे हिच्या हत्याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई केली. त्यानंतर आज कोर्टात हजर केलं होतं. त्यानंतर आरोपीला १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कृष्णा कनोजा असे आरोपीचे नाव आहे. दोघांमध्ये झालेल्या आर्थिक वादातून कृष्णाने त्याची सहकारी शुभदा कोदारे हिची हत्या केली आहे.