उत्तरकाशीमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या मदतीसाठी गिरिश महाजन रवाना

 उत्तरकाशीमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या मदतीसाठी गिरिश महाजन रवाना

उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात मुसळधार (Rain) पाऊस व ढगफुटी झाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. अवघ्या 34 सेकंदाच्या ढगुफटीनंतर धारली गाव ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं. दरम्यान या घटनेत150 हून अधिक लोक गाडले गेले असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

असे असताना महाराष्ट्रातील 150 हून अधिक पर्यटक या दुर्घटनेत अडकल्याचीहि भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) हे उत्तराखंडसाठी रवाना झाले आहेत. महाराष्ट्रातील शेकडो जण अडकले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे रेस्क्यू ॲापरेशनसाठी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) मदत कार्यासाठी रवाना झाल्याची माहिती पुढे आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार मंत्री महाजन हे उत्तरकाशीसाठी रवाना झाल्याचे पुढे आलं आहे.

उत्तरकाशीमध्ये महाराष्ट्रातील जवळपास 151 पर्यटक अडकले आहेत. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, सगळे पर्यटक सुखरूप आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून अनेकांशी संपर्क साधण्यात आला आहे. 151 पैकी जवळपास साठ पर्यटक अनुमान आश्रम इथे सुरक्षित आहेत. तर काहींचे लोकेशन्स ट्रेस करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *