पालखीमार्गात सुविधांसाठी ग्रामविकासचे २१ कोटी

 पालखीमार्गात  सुविधांसाठी ग्रामविकासचे २१ कोटी

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आषाढी एकादशी निमित्त पुणे, सातारा, सोलापूर या जिल्हयांतून मार्गक्रमण करणाऱ्या विविध संतांच्या पालख्यांसोबत असणाऱ्या भाविकांना स्वच्छता-सुविधा पुरविण्यासाठी मुक्कामाच्या ठिकाणी तात्पुरत्या शौचालयाची व्यवस्था करण्याच्या कामांस २१ कोटी रूपये निधीस मंजुरी देण्यात आले असल्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. महाजन म्हणाले, सन २०२३- २४ च्या अर्थसंकल्पीय भाषणात उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “संत ज्ञानेश्वर माऊली व संत तुकोबाराय यांचे पालखीसोबतच संत सोपानदेव, संत निवृत्तीनाथ व संत मुक्ताई यांचे निर्मलवारी करिता २० कोटी रूपये निधी देण्यात येईल” असी घोषणा केली होती.परंतु त्यांनी आता २१ कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत.

शासनाच्या वतीने वारकऱ्यांना चांगल्या सोयी सुविधा*महाजन म्हणाले,दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी पायी चालत पंढरपूर च्या दिशेने जात असतात,या मध्ये अनेक छोट्या मोठ्या दिड्या चाही सहभाग असतो.पालखी सोहळ्यात अनेक ठिकाणी मुक्काम केला जातो. या ठिकाणी वारकऱ्यांना शासनाच्या वतीने चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून हा २१ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न पालखी सोहळ्यातील संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज ,संत सोपान काका महाराज या प्रमुख पालख्यांचा प्रवास जावळपास २२ दिवसापेक्षा जास्त दिवसांचा असतो. अश्या वेळी वारकऱ्यांना मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे महाजन यांनी सांगितले.*ग्रामपंचायतींना निर्मल वारीसाठी 4 कोटी 21 लाख रुपये* सोलापूर, पुणे व सातारा जिल्ह्यातील पालखी मार्गातील ग्रामपंचायतींना निर्मल वारीसाठी 4 कोटी 21 लाख रुपयेचा निधी देण्यात येत आहे. यामध्ये वारी ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दी मधून जाणार आहे त्या ग्रामपंचायतीतील स्वच्छता राखणे व भाविकांना सुविधा पुरविणे याची जबाबदारी ग्रामपंचायतवर असणार आहे. शासनाने आपला निधी ग्रामपंचायतकडे सुपूर्द केला असल्याचे त्यांनी सांगितले.*पुणे जिल्हा परिषदेला १७ कोटी ६४,लाख रुपये निधीस मान्यता* या निधी मधून संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकोबाराय व संत सोपान देव या पालख्यांसोबत असणाऱ्या भाविकांसाठी तात्पुरते शौचालय, निवारा व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.जिल्हा परिषद, पुणे यांनी चालू वर्षात आषाढी वारी निमित्त शासनास सादर केलेल्या १७ कोटी ६४,लाख रुपये इतक्या निधीच्या प्रस्ताव मान्यता देण्यात आले असल्याचे महाजन यांनी यावेळी सांगितले.

ML/KA/PGB 1 Jun 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *