गिरगावात दसऱ्याला झाले सरस्वतीचे आगमन

 गिरगावात दसऱ्याला झाले सरस्वतीचे आगमन

मुंबई, दि २
गिरगावातल्या एसव्हीपी रोड मार्गावर जुन्या नव्या अमृतवाडीतील रहिवाशांना एकत्र आणण्यासाठी अमृतवाडीच्या मोकळ्या पटांगणात शारदीय नवरात्री उत्सवाचे औचित्य साधून दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर १०० वर्षांपूर्वी ज्ञान आणि बुद्धीची देवता सरस्वती मातेची मोठ्या भक्ती भावाने स्थापना करण्यात आली होती. ह्यामागे सर्व जाती-धर्मातील रहिवाशांना एकत्र आणण्याचा एका शिक्षकाचा मनसुबा होता. आज या उत्सवाला शंभर वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला गेला आहे. तरी देखील आताची तरुण पिढी एकत्र मिळू पूर्वीपेक्षाही मोठ्या थाटामाटात हा उत्सव साजरा करत आहे.

गिरगावातल्या एस व्ही पी रोडवर वसलेल्या जुन्या नव्या अमृतवाडीतील चाळींमध्ये असंख्य १० दशकांपेक्षा जास्त काळ वास्तव्य करत होती. कालांतराने या चाळींवर एका विकासकाची नजर पडली आणि त्याने चाळीचा पुनर्विकास हाती घेतला होता. दोन तीन वर्ष सलग काम सुरू असताना अचानक मध्येच करोना उद्भवल्याने टॉवरचे काम काम बंद पडले होते. त्यामुळे रहिवाश्याची चिंता वाढू लागली होती. घर मिळेल का नाही या चिंतेने रहिवासी ग्रस्त होते.परंतु त्यावेळी रहिवाश्यांनी सरस्वती मातेचा धावा केला आणि बंद पडलेले काम काही दिवसातच पुन्हा सुरू झाल्याची खबर कानावर आली. बघता बघता दोन २२ मजल्यांचे दोन उतुंग टॉवर उभे राहिले आणि अमृतवाडीतील 350 जुन्या रहिवावाश्यांना पूर्वीपेक्षा मोठी आणि आलिशान घरे मिळाली. ह्या घरातून दक्षिण मुंबईचा क्वीन नेकलेस म्हणजेच नरिमन पॉईंट चा समुद्र किनारा आणि मलबारहिलचे हिरवेगार डोंगर नजरेस पडत असल्याने रहिवासी सुखावली आहे. सरस्वतीच्या आशीर्वादाने आमच्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याचि भावना अमृतवाडीतल्या रहिवाशांनी व्यक्त केली आहे. म्हणून यावर्षीचा दसऱ्याच्या दिवशी होणार सरस्वतीचा उत्सव दणक्यात साजरा केला गेला.
गिरगावातील जुन्या नव्या अमृतवाडीतील चाळींचा पुनर्वविकास नुकताच झाला आहे. त्यामाध्यमातून साडेतीनशे रहिवाशांना उत्तुंग टॉवरमध्ये आलिशान घरे मिळाली आहे. रहिवाशांच्या घरांमधून मलबारहिलचे सौंदर्य आणि नरिमन पॉईंटचा नजारा नजरेस पडत असल्यामुळे सरस्वतीच्या आशीर्वादाने रहिवाशांना उत्तुंग टॉवरमध्ये आलिशान घर मिळाल्याची माहिती स्थानिक रहिवाश्यांनी दिली.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *