गिरगावचा राजाचा ‘वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया’ त नोंद

 गिरगावचा राजाचा ‘वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया’ त नोंद

मुंबई, दि २८ : फॉर्च्युन फूड्सने या गणेशोत्सवात इतिहास रचला. पारंपरिक साहित्य वापरून बनवलेला तब्बल ८०० किलो वजनाचा भव्य मोदक सादर करण्यात आला. वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियाने याला अधिकृत मान्यता देत ‘पारंपरिक साहित्यापासून बनवलेला सर्वात मोठा मोदक’ अशी नोंद केली आहे.या भव्य लोकार्पणाचा सोहळा मुंबईतील प्रसिद्ध ‘गिरगावचा राजा’ मंडपात झाला. हजारो भक्तांनी या ऐतिहासिक क्षणाला साक्षी राहून नंतर प्रसाद म्हणून वितरित करण्यात आलेल्या मोदकाचा आनंद आणि आशीर्वाद लुटला. सन 1928 मध्ये स्थापन झालेला ‘गिरगावचा राजा’ हा मुंबईतील सर्वात जुन्या आणि मानाच्या सार्वजनिक गणेश मंडळां पैकी एक आहे. मातीच्या पर्यावरणपूरक मूर्तीमुळे आणि झगमगाटाऐवजी परंपरेला दिलेल्या प्राधान्यामुळे या मंडळाला विशेष ओळख मिळाली आहे. यावर्षी विक्रमी मोदकाच्या लोकार्पणाने या परंपरेला एक नवा आयाम मिळाला आणि सणांच्या काळात लोकांना एकत्र आणणाऱ्या अन्नपदार्थांच्या चिरंतन भूमिकेची पुन्हा आठवण झाली.

श्री.गणेश लिंगायत, सचिव, गिरगावचा राजा मंडळ या प्रसंगी सांगितले,“गिरगावचा राजा हा नेहमीच भक्ती आणि समुदायभावनेचा उत्सव राहिला आहे. यावर्षी फॉर्च्युनने सादर केलेल्या विक्रमी मोदकामुळे आमच्या उत्साहात नव्या आनंदाची भर पडली. ही परंपरा आणि भव्यतेचं सुंदर मिश्रण ठरलेली ऐतिहासिक घटना होती, ज्यामुळे हजारो भक्तांच्या चेहऱ्यावर आनंद उमटला.”

फॉर्च्युन बेसन, फॉर्च्युन साखर, दूध आणि माव्यापासून बनवलेला हा भव्य मोदक मंडपाचे मुख्य आकर्षण ठरला. तो केवळ एका विक्रमाचा मानकरी नाही, तर देशातील प्रत्येक तीन घरांपैकी एका घराशी फॉर्च्युनचे असलेले नाते दर्शवणारा प्रतीकही ठरला. गिरगावचा राजा मंडपात फॉर्च्युनने तब्बल ५,००० चौरस फूटांवर ब्रँडिंग केले होते, ज्यामुळे या उत्सवाच्या भव्यतेसोबतच ब्रँडची उपस्थितीही अधोरेखित झाली.

श्री.मुकेश मिश्रा, जॉइंट प्रेसिडेंट-सेल्स अँड मार्केटिंग, एडल्ब्ल्यूएल अॅग्री बिझनेस लिमिटेड म्हणाले,“प्रत्येक भारतीय सणाच्या मध्यवर्ती ठिकाणी अन्न असतं, आणि गणेशोत्सवात मोदक ही सर्वात प्रिय प्रसादाची मिठाई आहे. देशातील सर्वात मोठा स्टेपल्स ब्रँड म्हणून फॉर्च्युन नेहमीच घराघरच्या स्वयंपाकघराचा भाग राहिला आहे – दैनंदिन जेवण असो वा सणासुदीचे जेवणावळी. पारंपरिक साहित्य वापरून सर्वात मोठा मोदक साकारण्यामागे आमचा उद्देश होता की गणेशोत्सव भव्य पातळीवर साजरा करताना आपल्या परंपरेलाही मान द्यावा. तसेच आम्हाला ठाऊक आहे की भारतातील प्रत्येक राज्यात सण साजरे करण्याची पद्धत वेगळी असते – महाराष्ट्रातला गणेशोत्सव असो किंवा बंगालमधील दुर्गापूजा. फॉर्च्युनची भूमिका म्हणजे या परंपरांशी मनापासून आणि खऱ्या अर्थाने जोडणं.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *