गुन्हे शाखेची बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कठोर कारवाई
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कठोर पावले उचलण्यात येत आहेत. मागील काही दिवसांत अनेक घुसखोरांवर कारवाई करून त्यांना अटक करण्यात आली.अशाच एका कारवाईत भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या चार बांगलादेशीं घुसखोरांना मुंबई गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.
शाआलम मोहम्मद शरीफ (39 ),रमजान मोहम्मद शरीफ (24 ),रजिया हुसेन सय्यद (27) व कुलसुम अजिज शेख (27 )अशी या बंगलादेशी घुसखोरांची नावे आहेत. हे चौघेही बांगलादेश येथील छोटा शेकाटी, ठाणा कोतवाली , जशोर,चे रहिवासी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-६ चे पथकातील पो.शि. कोळेकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ट्रॉम्बे पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवशक्ती चाळ, महाराष्ट्र नगर नंबर ३, शांतीनगर येथे छापा मारला . छाप्यात दोन पुरुषासह दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांच्या मोबाईलमध्ये बांगलादेशी संपर्क क्रमांक आणि इमो अॅपच्या माध्यमातून तेथील नातेवाईक व मित्रांशी संपर्क केल्याचे निष्पन्न झाले.
बांगलादेशी नागरिकांनी भारतात प्रवेश करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे सादर न केल्यामुळे आणि अनधिकृतपणे वास्तव्य केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.असे गुन्हे शाखेचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत घोणे यांनी सांगितले.
ML/ML/PGB 28 Jan 2025