घृष्णेश्वर मंदिरात श्रावण सोमवार निमित्त भाविकांची गर्दी….

छ संभाजीनगर दि २८– श्रावण महिन्याची सुरुवात झाली असून पहिल्या श्रावण सोमवार निमित्त देशभरातील शिवमंदिरांमध्ये पहाटेपासूनच शिवभक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केलीय.आज श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी बारावे ज्योतिर्लिंग असलेले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिर शिवभक्तांनी गजबजून गेलं आहे .

बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळ येथील घृष्णेश्वराच्या दर्शनाला मोठं महत्त्व आहे. १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वेरूळ येथील मंदिरात पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त मध्यरात्री १२ वाजता घृष्णेश्वराला पंचामृताने अभिषेक घालण्यात आला. या पूजेनंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आलं. आज पहिल्याच दिवशी देशभरातून शिवभक्त दर्शनासाठी दाखल झाले. शिवभक्तांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून पोलीस आणि मंदिर प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. ML/ML/MS