घेवड्याच्या शेंगांची भाजी
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
पाव किलो घेवड्याच्या शेंगा
१ लहान कांदा
२-३ लसुण पाकळ्या
२-३ टेबलस्पून दाण्याचे कुट
चविप्रमाणे कांदा लसुण मसाला, मीठ
फोडणीसाठी – तेल(१-२ टेबलस्पून), जिरे, मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता
कोथिंबीर
क्रमवार पाककृती:
१. घेवड्याच्या शेंगांचे कडेचे धागे, दोन्हीबाजुची टोके काढुन टाकावेत. शेंगा उघडून नीट तपसाव्यात कारण यात कधी कधी आळ्या वगैरे असतात.
२. सोललेल्या शेंगा धुवुन निथळून बारिक (१/२ सेंटीमीटर जाडी) कापाव्यात.
३. कांदा बारीक कापावा. लसूण बत्त्याने ठेचुन घ्यावा.
४. तेलात नेहेमीप्रमाणे फोडणी करुन त्यावर मंद आचेवर कांदा परतावा.
५. कांदा परतून झाल्यावर त्यात लसुण घालुन एखादा मिनीट परतावे.
६. त्यावर चिरलेल्या शेंगा घालून साधारण ४-५ मिनीटे परतावे.
७. त्यावर अगदी एखादा पळी पाणी आणि चवीप्रमाणे मीठ घालून झाकण ठेवुन शिजण्यास ठेवावे.
८. अर्धवट शिजले की त्यात कांदा लसूण मसाला घालावा. नीत मिसळावे आणि उरलेली भाजी शिजवावी.
९. पूर्ण शिजल्यावर त्यात दाण्याचे कूट घालून परतावे. कोथिंबीर घालून गरम भाकरी/चपाती बरोबर खावे.
ML/ML/PGB
27 Aug 2024