‘घाशीराम कोतवाल’ आता हिंदी रंगभूमीवर
मुंबई, दि. २९ : मराठी रंगभूमीवरील मैलाचा दगड असलेलं नाटक म्हणजे घाशीराम कोतवाल. विजय तेंडुलकर यांच्या लेखणीतून अजरामर झालेलं ‘घाशीराम कोतवाल’चं वादळ आता हिंदी रंगभूमीवर येण्यासाठी सज्ज झालं आहेत. पण ते मराठीत नाही तर हिंदी रंगभूमीवर पाहायला मिळणार आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते संजय मिश्रा यात प्रमुख भूमिकेत असणार आहे. या नाटकाचं पहिलं पोस्टर नुकतंच रिलीज झालं आहे.
मराठी रंगभूमीवरील सुवर्णपान ठरलेलं ‘घाशीराम कोतवाल’ नाटक आता हिंदीत आपल्या समोर येणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक अभिजित पानसे आणि भालचंद्र कुबल रंगभूमीवर आपल्या दिग्दर्शनाची जादू दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाची निर्मिती आकांक्षा ओमकार माळी आणि अनिता पालांडे यांच्या निर्मितीसंस्थेने केली आहे.
ज्येष्ठ अभिनेते संजय मिश्रा यांच्यासह मराठी अभिनेता संतोष जुवेकर आणि उर्मिला कानेटकर या नाटकात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तर नाटकाची नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर असणार आहे.
SL/ML/SL